Recruitment Notice for B.Sc(CS) BBA(CA) B.Com
राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास मंडळ,
इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे, इंडियन रेड क्रॉस सोसायटी पुणे,
लायन्स क्लब पुणे, घोलप ब्लड बँक, पुणे
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
रक्तदान शिबीर, हिमोग्लोबिन जाणीव -जागृती आणि प्रथमोपचार प्रशिक्षण
दि. 9 डिसेंबर 2021 रोजी महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना एकक ,विद्यार्थी विकास मंडळ, इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे, इंडियन रेड क्रॉस सोसायटी पुणे, लायन्स क्लब पुणे , घोलप ब्लड बँक, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर, हिमोग्लोबिन जाणीवजागृती आणि प्रथमोपचार प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
रक्तदान शिबिर:
दि. 9 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 09:30 वा. रक्तदान शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवीदास गोल्हार, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी एम. जे. एफ. लायन सी. ए. श्री. अभय शास्त्री यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी घोलप ब्लड बँकेचे प्रभारी श्री. रोहिदास घोलप, डॉ. मीनाक्षी देशपांडे (अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोशिएशन, पुणे शाखा), डॉ. राजकुमार शहा (अध्यक्ष, आपत्ती निवारण समिती आणि संचालक, प्रथोमचार प्रशिक्षण केंद्र इंडियन रेडक्रॉस सोसायटी, पुणे), डॉ. आरती निमकर (प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ), इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
बर्थ डे ब्लड डोनर्स क्लबचे अनावरण:
या रक्तदान शिबिराच्या निमित्ताने महाविद्यालयात बर्थ डे ब्लड डोनर्स क्लब या अभिनव उपक्रमाचे देखील उदघाटन करण्यात आले. आपल्या जन्मदिनाचे औचित्य साधून आपला वाढदिवस रक्तदान करून साजरा करावा या उदात्त हेतूने हा क्लब महाविद्यालयात सुरु करण्यात आला, जेणेकरून वर्षभरात रक्त तुटवडा न भासत अविरतपणे रक्तपुरवठा सुरु राहील.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. प्रवीण कड यांनी केले. तर प्रास्ताविक सुशील गंगणे यांनी केले. महाविद्यालय विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. अमोल चौधरी, डॉ. संदीप अनपट, प्रमोद सपकाळ ,प्रा. योगेश करंडे यांनी रक्तदान शिबिराचे व्यवस्थापन केले.
'रक्तदान - सर्वश्रेष्ठ दान' या उक्तीप्रमाणे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात आपला सक्रिय सहभाग नोंदविला. या शिबिरात १०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी तसेच स्वयंसेवकांनी रक्तदान केले.
दिनांक 1 डिसेंबर 2021 रोजी मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात 'विषमता निर्मूलन. एड्स निर्मूलन' ("END INEQUALITIES , END AIDS") या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर स्पर्धा ही ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने घेण्यात आली. या स्पर्धेत महाविद्यालयातील 40 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. स्पर्धेचे आयोजन दि. 1 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10:30 ते 12:00 या वेळेत करण्यात आले होते.या स्पर्धेसाठीचे नियोजन महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रवीण कड तसेच विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी प्रा. अमोल चौधरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी संचालनासाठी प्रा. सुशील गंगणे, डॉ. शिल्पा काबरा, डॉ. अश्विनी पारखी प्रा.प्रमोद सपकाळ यांचे सहकार्य लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवीदास गोल्हार यांनी विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल अभिनंदन केले.
The Certificate courses are useful to build rare skillsets.The honor function was arranged to recognize and diligent work and devotion of students who completed 'Fundamentals of Remote Sensing using GIS Technology'. The Certificate Distribution Ceremony was conducted on 21st October 2021 at 2:00 PM for 52 students of TYBSc(CS) with MMCC as Nodal Center for the said programme. Dr. Anpat S M was also awarded the certificate for his course completion and contribution as nodal officer.
Aarya and Yugandhara from TYBSC(CS) expressed that the course broaden our focus and left us to explore more such opportunities in Image processing. Suraj Mandal expressed gratitude for providing this course and adding value in the curriculum.
Few Glimpses of Students posing happily with their certificate on 'Fundamentals of Remote Sensing using GIS Technology' issued by IIRS-ISRO.
The Academic year for first year started from 9th Sept 2021. The Guest Lecture series for both the students has been started from 9th Sep 2021. The programme were scheduled on online platform by Google Meet.
दिनांक :- १८.१०.२०२१
महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन ’ निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा अहवाल
भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ, भारतरत्न डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्म दिन दर वर्षी ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्या प्रमाणे महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागातर्फे या वर्षीही दि. १४ ऑक्टोबर २०२१ रोजी ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाकरिता श्री. तेज निवळीकर सर, कार्यकारी मंडळ सदस्य, मराठवाडा मित्र मंडळ पुणे व माजी विभागप्रमुख निरंतर शिक्षण विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास गोल्हार यांनी सहभाग नोंदविला.
दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. सूत्रसंचालक डॉ. संदीप अनपट, विभाग प्रमुख, संगणक शास्त्र विभाग यांनी कार्यक्रमात सहभागी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे स्वागत करून प्रास्थाविकामध्ये ‘वाचन प्रेरणा दिन’ कार्यक्रमाची पार्श्वभूमी व प्रयोजन विषद करून डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विषयी थोडक्यात माहिती सांगितली. प्रा. सुशिल गणगणे यांनी कार्यक्रमाचे वक्ते श्री. तेज निवळीकर सर, कार्यकारी मंडळ सदस्य, मराठवाडा मित्र मंडळ पुणे व माजी विभागप्रमुख निरंतर शिक्षण विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांची ओळख करून दिली.कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास गोल्हार यांनी त्यांच्या भाषणा मध्ये डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या कार्याचा गौरव करून शिक्षण, संशोधन आणि सार्वजनिक जीवनात वाचनाचे महत्व विषद केले. तसेच, सार्वांनी अधिकाअधिक वाचन करावे असे सांगितले.
प्रमुख वक्ते श्री. तेज निवळीकर सर, यांनी त्यांच्या व्याख्यानात डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या आयुष्यातील महत्वाच्या प्रसंगांचा उल्लेख करून डॉ.कलाम वाचनातून कसे घडत गेले ते सांगितले, तसेच डॉ. कलाम यांच्या जडणघडणीत त्यांच्या शिक्षकांचा वाटा आणि त्याबद्दल कलामांनी व्यक्त केलेली कृतज्ञता याचाही उल्लेख केला. डॉ.कलाम यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू निदर्शनास आणून दिले आणि मानवी स्वभाव, विज्ञान व अध्यात्म यातील फरक, माहिती व ज्ञान यातील फरक, नेत्तृत्वाचे वेगवेगळे प्रकार सांगून आजच्या शिक्षकांनी डॉ.कलाम यांच्यापासून प्रेरित होऊन वाचनाचा छंद जोपासावा असा सल्ला दिला.
महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रंथालयातील कर्मचारी यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदविला. प्रा. अमोल चौधरी आणि ग्रंथालयातील कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. ग्रंथपाल श्री. मनोहर वी. गोहणे यांनी आभार व्यक्त केले. डॉ. संदीप अनपट यांनी सूत्रसंचालन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास गोल्हार यांनी मार्गदर्शन केले.
The College established Competitive Exam Guidance Center with the prime objective of imparting quality education to the students and nurturing them for various competitive examinations.The center was inaugurated online on 11 July 2021 at the hands of Dr.Rajendra Bharud, IAS District Magistrate & Collector Dist Nandurbar.He expressed Mental Toughness,Commitment towards the goal,preparedness and source of inspiration are the mantra of being successful.Prof Dr. Anpat ,Prof Sushil Gangane and Prof Pravin Kad ensured the smooth conduct of the event.
Click here To View Details...
Online workshop on “Cyber Security” was organized as part of IQAC initiative on 13th March 2021 for the students of second and third year BBA(CA) and B.Sc(CS) . Around 100 students attended the online session that was conducted by Ms. Seema Dixit, Senior Security Consultant in IQSPL Pvt. Ltd., Pune. The session focused on software online tools and techniques for understanding cyber security, data security, mobile security etc. The students showed keen interest in these online tools and posed many queries related to the certification too.
* mark fields are compulsory
Powered by ChronoForms - ChronoEngine.com